*कुमारिका उखाणे :-*
▪︎ पुराणाच्या पोळीसाठी आणला गहू ,
पुराणाच्या पोळीसाठी आणला गहू ,
ओ ,लग्नच नाही झालं तर नाव कुणाचा घेऊ
▪︎ भिंतीवरच्या घडल्यात वाजले नऊ ,
भिंतीवरच्या घडल्यात वाजले नऊ ,
लग्नच नाही झालं तर नाव कुणाचे घेऊ
▪︎ पिंपळाच्या पानावर पाय कसा ठेऊ ,
पिंपळाच्या पानावर पाय कसा ठेऊ ,
लग्नाच्या आधी नाव कसा घेऊ
▪︎ अलीकडे अमेरिका, पलीकडे अमेरिका,
अलीकडे अमेरिका, पलीकडे अमेरिका,
नाव घेण्यास सांगू नका, मी आहे कुमारिका
▪︎ चांदीच्या ताटात ठेवले होते गहू ,
चांदीच्या ताटात ठेवले होते गहू ,
लग्नच झाले नाही तर नाव कुणाचे घेऊ?
▪︎ अंगणात पेरले पोतेभर गहू ,
अंगणात पेरले पोतेभर गहू ,
लिस्ट आहे मोठी, कुणा कुणाचे नाव
घेऊ?
▪︎ नाव घ्या, नाव घ्या, हा काय कायदा,
नाव घ्या, नाव घ्या, हा काय कायदा,
कोणाच नाव घेतला तर तूमचा काय
फायदा
*विवाह ठरल्यानंतर उखाणे :-*
▪︎ गणपतीला वाहिला , भरजरी शेला ,
गणपतीला वाहिला , भरजरी शेला ,
….. पंतांचे नाव घ्यायला आत्ताच आरंभ केला
▪︎ गजाननाची कृपा , गुरूंचा आशीर्वाद ,
गजाननाची कृपा , गुरूंचा आशीर्वाद ,
…. पंतांचे नाव घ्यायला आज करते सुरुवात
▪︎ रक्तवर्णी गुलाब , आवडतो गणपतीला ,
रक्तवर्णी गुलाब , आवडतो गणपतीला ,
…....पंतांचे नाव घेण्याला केली मी सुरुवात
▪︎संसाररूपी कांदबरीचे उघडले पाहिलं पानं ,
संसाररूपी कांदबरीचे उघडले पाहिलं पानं ,
........ पंतांचे नाव घेऊन तुमचा करिते मान
▪︎मानवाने करू नये कुणाचाही हेवा,
मानवाने करू नये कुणाचाही हेवा,
.... पंतांचे नाव घेते आशीर्वाद सर्वांचा हवा
▪︎अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना,
अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना,
...... पंताचे नाव घेणासाठी शब्द पुरेना
▪︎रोज दिवस नवा व अनुभवही नवा,
रोज दिवस नवा व अनुभवही नवा,
.. पंतांचे नाव घेते आशीर्वाद तुमचा हवा
▪︎आशेच्या रंगमंचावर स्वप्नाचे पडसाद,
आशेच्या रंगमंचावर स्वप्नाचे पडसाद,
.. पंतांचे नाव घेते तुम्हा सर्वांचा आशीर्वाद
▪︎ वर्षाऋतूमध्ये वरुणराजाने केली बरसात ,
वर्षाऋतूमध्ये वरुणराजाने केली बरसात ,
... पंतांचे नाव घेण्याला केली मी सुरुवात
▪︎ चांदीच्या समयीत रेशमाची वात ,
चांदीच्या समयीत रेशमाची वात ,
…. पंतांचे बरोबर करते संसाराला सुरुवात
▪︎ आकाशात उडतोय पक्शान्चा थवा
आकाशात उडतोय पक्शान्चा थवा
…….. पंतांचे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा
▪︎ आशीवार्दाची फुले वेचते वाकून
आशीवार्दाची फुले वेचते वाकून
...... पंतांचे नाव घेते तुमचा मान राखून
▪︎ द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
.... पंतांचे नाव घेते राखते तुमचा मान
▪︎ रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात ,
रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात ,
...................... पंतांचे नाव घेते असू द्या लक्षात
▪︎ चतूर्थीच्या दिवशी चंद्र निघाल्यावर आला गारवा ,
चतूर्थीच्या दिवशी चंद्र निघाल्यावर आला गारवा ,
............. पंत बसलेत पूजेला , मी निवडते दुर्वा
▪︎मी नव्हती सुंदर तरी मला निवडले ,
मी नव्हती सुंदर तरी मला निवडले ,
.. पंतांचे चे हेच रूप मला आवडले
▪︎उखाणा आठवत नाही, आता काय करू,
उखाणा आठवत नाही, आता काय करू,
......... पंतांचा नाव घेते, नका घाई करू
▪︎नेत्रांच्या निरंजनात प्रीतीची वात ,
नेत्रांच्या निरंजनात प्रीतीची वात ,
... पंतांच्या नावाने संसाराला करते सुरुवात
▪︎ सर्वांच्या आशीर्वादाची शाल घेते पांघरून ,
सर्वांच्या आशीर्वादाची शाल घेते पांघरून ,
.......... पंतांच्या बरोबर मन गेलं गांगरून
▪︎अंगावरच्या शेलारीला बांधून त्यांचा शेला ,
अंगावरच्या शेलारीला बांधून त्यांचा शेला ,
.. पंतांचे नाव घेण्यास आज शुभारंभ केला
▪︎कलियुगात कधी घडणार चमत्कार ,
कलियुगात कधी घडणार चमत्कार ,
.... पंतांच नाव घेऊन सर्वना नमस्कार
▪︎उखाणा घेते मी इजी,
उखाणा घेते मी इजी,
... पंत नेहमीच बीझी
▪︎अरुणासह उषा आली, सोनीयाची प्रभा पसरली,
अरुणासह उषा आली, सोनीयाची प्रभा पसरली,
............. पंताचे नाव घ्यायला मी नाही विसरली
*साखरपुड्याची उखाणे :-*
▪︎ मंगल झाली प्रभात , विहंग उडाले गात ,
मंगल झाली प्रभात , विहंग उडाले गात ,
..........…..... पंतांच्या हाती दिला हात
▪︎ मनाला समाधान देते , देवापुढची सांजवात ,
मनाला समाधान देते , देवापुढची सांजवात ,
…. पंतांच्या, हाती दिला साखरपुड्याला दिवशी हात
▪︎ हिरवी नेसली साडी, हिरवा भरला चुडा ,
हिरवी नेसली साडी, हिरवा भरला चुडा ,
…. पंतांचे नाव घेते आज आमचा साखरपुडा
▪︎ नैवैद्याच्या वरण - भातावर तूप वाढले ताजे ,
नैवैद्याच्या वरण - भातावर तूप वाढले ताजे ,
………… पंतांच्या आंगठीवर नाव कोरले माझे
▪︎ प्रेमगीत मनी घेऊन , सूर्याभोवती पृथ्वी फिरते ,
प्रेमगीत मनी घेऊन , सूर्याभोवती पृथ्वी फिरते ,
…….......….. पंतांचे नाव घेताच , मनी प्रीती फुलते
▪︎ समोरच्या फडताळात ठेवले होते फणसाचे गरे ,
समोरच्या फडताळात ठेवले होते फणसाचे गरे ,
.... वरून दिसतात बरे नीट वागतील तेव्हा खरे
*मेहंदीचे उखाणे :-*
▪︎ बागडते फुलपाखरे ,रंग बेरंगी त्यांचे रंग ,
बागडते फुलपाखरे ,रंग बेरंगी त्यांचे रंग ,
..पंतांचे नाव घेते , संख्या मेहंदी काढण्यात दंग
▪︎दवबींदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग,
दवबींदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग,
.... मेह्ंदी काढण्यात सख्या माझ्या दंग
▪︎ मेहंदीच्या रंगाने , रंगले दोंन्ही हाथ ,
मेहंदीच्या रंगाने , रंगले दोंन्ही हाथ ,
…… पंतांना देईन मी पदोपदी साथ
▪︎ गायीच्या शिंगाना , लावला सोनेरी रंग ,
गायीच्या शिंगाना , लावला सोनेरी रंग ,
.. पंतांचे नाव घेते , संख्या मेहंदी काढण्यात दंग
▪︎ प्रभात समय , सुखावतो गाता भूपाळी ,
प्रभात समय , सुखावतो गाता भूपाळी ,
……. पंतांचे नाव घेते मेहंळदीच्या वेळी
▪︎ सावल्या हातावर , खुलतो मेहंदीचा रंग ,
सावल्या हातावर , खुलतो मेहंदीचा रंग ,
…. पंतांचे नाव , ऐकण्यात माझ्या संख्या झाल्या दंग
▪︎ हळदी आधी , हातही माझ्या , रेखाली मेहंदी छान ,
हळदी आधी , हातही माझ्या , रेखाली मेहंदी छान ,
…. शिवाय दुसऱ्या कुणाचा , असेल सांगा हा मान
*कुंकवाचे उखाणे :-*
▪︎ राजहंसाच्या पिल्लास चारा, हवा मोत्याचा ,
राजहंसाच्या पिल्लास चारा, हवा मोत्याचा ,
…. पंतांचे नाव घेते , आशीर्वाद द्या सौभाग्याचा
▪︎ पौर्णिमेच्या चंद्राची , उज्ज्वल प्रभा ,
पौर्णिमेच्या चंद्राची , उज्ज्वल प्रभा ,
…... पंत हेच माझ्या सौभाग्याचा शोभा
▪︎ विवाहरूपी कादंबरीत रेखाला भावनेच्या ओळी ,
विवाहरूपी कादंबरीत रेखाला भावनेच्या ओळी ,
……........… पंतांच्या नावाचा कुंकू लावते भाळी
▪︎ कपाळाचा कुंकू , जसा चांदण्याचा ठसा ,
कपाळाचा कुंकू , जसा चांदण्याचा ठसा ,
……..... पंतांचे नाव घेते , सारे जण बसा
▪︎ डाळिंब ठेवले फोडून , संत्र्याची काढली साल ,
डाळिंब ठेवले फोडून , संत्र्याची काढली साल ,
………...........पंतांचे नावाने कुंकू लावते लाल
▪︎ विचार करता – करता , प्रश्नाची सुटली शृंखला ,
विचार करता – करता , प्रश्नाची सुटली शृंखला ,
……... पंतांनि घातली मला सौभाग्याची मेखला
▪︎ काळी चंद्रकला तिला मोतीचूर पदर ,
काळी चंद्रकला तिला मोतीचूर पदर ,
..………….पंता जीवावर कुंकवाचा गजर
▪︎ केळ देते सोलून, पेरू देते कापून ,
केळ देते सोलून, पेरू देते कापून ,
......पंतांच्या जीवावर कुंकू लावते कोरून
*बांगडीभरतानाचे उखाणे :-*
▪︎ लवंग जायपत्री , पानाचा विडा ,
लवंग जायपत्री , पानाचा विडा ,
…. पंतांच्या नावाने भरते हिरवा चुडा
▪︎ रातराणीचा सुगंध , त्यात मंद वारा ,
रातराणीचा सुगंध , त्यात मंद वारा ,
.... पंतांच्या नावाने , भरला हिरवा चुडा
▪︎ प्राजक्ताच्या फुलांनी भरले आंगण ,
प्राजक्ताच्या फुलांनी भरले आंगण ,
…..... पंतांचे नाव घेऊन घातले कंकण
▪︎ पूजेच्या साहित्यात ,उदबत्तीचा पूड ,
पूजेच्या साहित्यात ,उदबत्तीचा पूड ,
…. पंतांचा नावाने भरला सौभाग्याचा चुडा
▪︎ वेलची लवंग , खोबरे घालून केला पानाचा विडा ,
वेलची लवंग , खोबरे घालून केला पानाचा विडा ,
……...... पंतांच्या नावाने घातला मी हिरवा चुडा
▪︎ चंदनाचा झाडाला , नागिणीचा वेढा ,
चंदनाचा झाडाला , नागिणीचा वेढा ,
….. पंतांच्या राणीला मोत्याचा चुडा
*मुंडावलीचे उखाणे :-*
▪︎ अलीबागच्या समुद्राचा प्रेक्षणीय आहे थाट,
अलीबागच्या समुद्राचा प्रेक्षणीय आहे थाट ,
…..... पंतांचे नाव घेऊन बांधते मुंडावलीची गाठ
▪︎ दारात आंगण , अंगणात काढली रांगोळी ,
दारात आंगण , अंगणात काढली रांगोळी ,
….......... पंतांच्या नावाची बांधते मुंडावली
▪︎ हिंदमातेच्या डोक्यावर मोत्याची जाळी ,
हिंदमातेच्या डोक्यावर मोत्याची जाळी ,
…... पंतांचे नाव घेऊन भाधते मुंडावली
▪︎ भिलवडी आहे प्रेक्षणीय थाट ,
भिलवडी आहे प्रेक्षणीय थाट ,
… पंतांचे नाव घेऊन बांधते मुंडावलची गाठ
▪︎ चांदीच्या ताटात रुपये 360 ,
चांदीच्या ताटात रुपये 360 ,
…पंतांचे नाव घेऊन भाधते मुंडवलीची गाठ
*हळकुंड उखाणे :-*
▪︎ प्राजक्ताच्या फुलांनी , भरले आंगण ,
प्राजक्ताच्या फुलांनी , भरले आंगण ,
…....... पंतांचे नाव घेऊन घातले कंकण
▪︎ आत्मरुपी करंडा , देहरूपी झाकण ,
आत्मरुपी करंडा , देहरूपी झाकण ,
….... पंतांचे नाव घेऊन बांधते मी कंकण
▪︎ नाव आहे ओठी , पण लज्जेचं बंधन ,
नाव आहे ओठी , पण लज्जेचं बंधन ,
….... पंतांचे नाव घेऊन सोडते मी कंकण
▪︎ चंद्रबोहती आहे तारकांचे रिंगण ,
चंद्रबोहती आहे तारकांचे रिंगण ,
…. पंतांचे नावाने बांधलं मी कंकण
▪︎ सडारांगोळी सुशोभित केला आहे आंगण ,
सडारांगोळी सुशोभित केला आहे आंगण ,
…......... पंतांचे नाव घेते बांधते मी कंकण
▪︎ संस्काराचे बंधन जपते कंकण बांधून ,
संस्काराचे बंधन जपते कंकण बांधून ,
…. पंतांचे नाव घेऊन बांधते मी कंकण
▪︎ विवाह म्हणजे दोन जीवांच्या भावनांची गुंफण ,
विवाह म्हणजे दोन जीवांच्या भावनांची गुंफण ,
……......... पंतांचे नाव घेऊन बांधते मी कंकण
▪︎ कलमी आंब्याला झारीने करते शिंपण ,
कलमी आंब्याला झारीने करते शिंपण ,
…...... पंतांचे नाव घेऊन सोडते कंकण
▪︎ सागराला शोभते निळाईचे झाकण ,
सागराला शोभते निळाईचे झाकण ,
….... पंतांचे नाव घेऊन सोडते कंकण
▪︎ छोटेसे आसवं घर , मागेपुढे असावे आंगण ,
छोटेसे आसवं घर , मागेपुढे असावे आंगण ,
……....… पंतांचे नाव घेऊन सोडावे कंकण
*हळदीचे उखाणे :-*
▪︎ फुटता तांबडं पूर्वेला , कानी येते भूपाळी ,
फुटता तांबडं पूर्वेला , कानी येते भूपाळी ,
……...……. पंतांचे नाव घेते हळदीच्या वेळी
▪︎ अंगानी टाकला सडा , त्यावर घातली रांगोळी ,
अंगानी टाकला सडा , त्यावर घातली रांगोळी ,
…………...... पंतांचे नाव घेते हळदीच्या वेळी
▪︎ लावा हळद हवी तेवढी , काहीच नाही म्हणेन ,
लावा हळद हवी तेवढी , काहीच नाही म्हणेन ,
ती उतरवायला मी , ………..… ला च बोलवेन
▪︎प्रत्येक क्षण येतो अनुभव घेऊन आगळा,
प्रत्येक क्षण येतो अनुभव घेऊन आगळा,
........ पंतांचे नाव घेते , हळदीचा सोहळा
▪︎ बहरली फुलांनी , निशिगंधाची पाती ,
बहरली फुलांनी , निशिगंधाची पाती ,
….. पंतांचे नाव घेते हळदीच्या राती
▪︎ सूर्यबिंब शोभते , संध्येच्या भाळी ,
सूर्यबिंब शोभते , संध्येच्या भाळी ,
…….......… घेते हळदीच्या वेळी
▪︎ अंगानी टाकला सडा , त्यावर घातली रांगोळी ,
अंगानी टाकला सडा , त्यावर घातली रांगोळी ,
…………..... पंतांचे नाव घेते हळदीच्या वेळी
▪︎ अन्यन भावनेने देवाला जावे शरण ,
अन्यन भावनेने देवाला जावे शरण ,
…. पंतांचे नाव घ्यायला हळदीचे आहे कारण
▪︎ आडघर माजघर , माजघरात पलंग , पलंगावर उशी ,
आडघर माजघर , माजघरात पलंग , पलंगावर उशी ,
………........….… पंतांचे नाव घेते हळदीच्या दिवशी
▪︎ तांब्याच्या घागरी , चकचक घासल्या ,
तांब्याच्या घागरी , चकचक घासल्या ,
….. पंतांचे नाव घेते , माझा परिवार हळदीला नाचला
▪︎ प्रभात समय सुखावतो गाता भूपाळी ,
प्रभात समय सुखावतो गाता भूपाळी ,
…….. पंतांचे नाव घेते हळदीच्या वेळी
▪︎ मांडवाचये दारी केळीच्या तोरण ,
मांडवाचये दारी केळीच्या तोरण ,
…. पंतांचे नाव घेते हळदीच्या कारण
*मंडपातील उखाणे :-*
▪︎ वृक्षाच्या छायेत, वनदेवी घेते विसावा
वृक्षाच्या छायेत, वनदेवी घेते विसावा
... पंतांचे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा
▪︎ भक्त्तांसाठी वेडा झाला , नंदाचा नंदन ,
भक्त्तांसाठी वेडा झाला , नंदाचा नंदन ,
….....पंतांचे नाव घेते सर्वाना करून वंदन
▪︎ यमुनाजलावर पडली , ताजमहालाची सावली ,
यमुनाजलावर पडली , ताजमहालाची सावली ,
……….....…. ला जन्म देणारी धान्य ती माउली
▪︎ दिव्य आसवं काव्य , काव्यात असावी गोडी ,
दिव्य आसवं काव्य , काव्यात असावी गोडी ,
……....… व …….....… ची सुखी राहावी जोडी
▪︎वाटलेल्या डाळीचे , चटमटीत केले पिठले ,
वाटलेल्या डाळीचे , चटमटीत केले पिठले ,
....... पंतांचे नाव घेते आजून नाही दिसले
▪︎सकाळी सकाळी कोकिळा गाती गोड ,
सकाळी सकाळी कोकिळा गाती गोड ,
....... पंतांना पाहण्याची लागती ओढ
▪︎सह्याद्री पर्वतावर होते शिवरायांचे दर्शन ,
सह्याद्री पर्वतावर होते शिवरायांचे दर्शन ,
........ पंतांच्या कधी घडेल होणार दर्शन
▪︎इकडे आहे शेती , तिकडे आहे वाडी ,
इकडे आहे शेती , तिकडे आहे वाडी ,
अवतिभोतीला हिरवी झाडी , आणि मधून चालीय ....
पंतांची स्वारी
▪︎नव्हती कधी गाठ भेट, एकदाच झाली नजरा नजर ,
नव्हती कधी गाठ भेट, एकदाच झाली नजरा नजर ,
......................... पंतांसाठी सुटला प्रीतीचा पाझर
▪︎दिव्याच्या वातीला लागतो तेलाचा आधार ,
दिव्याच्या वातीला लागतो तेलाचा आधार ,
..... पंतांच्या साथीने मानते सर्वांचे आभार
▪︎ लवंगी वाडी , बदामी बंगला ,
लवंगी वाडी , बदामी बंगला ,
….पंतांच्या प्रपंचात जीव माझा रंगला
▪︎ वळिवाच्या पावसाने , गंधित होते माती ,
वळिवाच्या पावसाने , गंधित होते माती ,
.. पंतांचे नाव घेऊन नवीन जोडली नाती
▪︎लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा ,
लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा ,
.... पंतांच नाव घेऊन उखाणा करते पुरा
▪︎ मानवी जीवन हे एक आहे शाळा ,
मानवी जीवन हे एक आहे शाळा ,
… पंतांचा नाव घेते , जमलाय मंगल सोहळा
▪︎ उखाण्यात उमटावं शब्दांचे लालित्य ,
उखाण्यात उमटावं शब्दांचे लालित्य ,
……... पंतांचे घेते त्यात आहे पावित्र्य
▪︎ .... ( गावाचे नाव ) संत्री , ..... ( गावाचे नाव ) चे नारळ ,
.... ( गावाचे नाव ) संत्री , ..... ( गावाचे नाव ) चे नारळ ,
…............... पंतांचे नाव घेते , साधे आणि सरळ
▪︎ सायकल चालते वेगाने , नस धावते क्रमाने ,
सायकल चालते वेगाने , नस धावते क्रमाने ,
….. पंतांचे नाव घेते , तुमच्या म्हणण्याप्रमाणे ,
▪︎ खारकेची झाडावर , चढला दोडक्याच्या वेळ ,
खारकेची झाडावर , चढला दोडक्याच्या वेळ ,
…......…. पंतांचे नाव घेते , वाचावा इंधनाचे तेल
▪︎ बकुळीच्या झाडाखाली पडलाय सुवासिक सडा ,
बकुळीच्या झाडाखाली पडलाय सुवासिक सडा ,
………....….. व ……........… चा सुखी राहो जोड
▪︎ जाई जुईच्या वेलीखाली , हरीण घेते विसावा ,
जाई जुईच्या वेलीखाली , हरीण घेते विसावा ,
…... पंतांचा नाव घेते , तुमचा आशीर्वाद असावा
▪︎ मेघवर्णी आकाशात , लकाकते चपला ,
मेघवर्णी आकाशात , लकाकते चपला ,
…..… ला ……. आशीर्वाद द्या आपला
▪︎ दासांचा दासबोध अनुभवाचा साठा
दासांचा दासबोध अनुभवाचा साठा
.... पंतांचे नाव घेतो तुमचा मान मोठा !
*सप्तपदीचे उखाणे :-*
▪︎फुल आहे गंध भाव आहे अंतरी ,
फुल आहे गंध भाव आहे अंतरी ,
..... पंतासह चालले सातपावलांवरी ,
▪︎शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी,
शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी,
..................... पंत माझे जीवन साथी
▪︎ विवाह होमामुळे झाले , पवित्र वातावरण ,
विवाह होमामुळे झाले , पवित्र वातावरण ,
…..पंतांचे नाव घेते , करून ईश्वराचे स्मरण
▪︎डझनभर येतात १२ केळी ,
डझनभर येतात १२ केळी ,
.... पंतांचे नाव घेते सप्तपदीच्या वेळी
▪︎ पुंडलिकाचे भेटीसाठी उतरते चंद्रभागा घाट ,
पुंडलिकाचे भेटीसाठी उतरते चंद्रभागा घाट ,
………. पंतांचे नाव घेते दूर झाला आंतरपाट
▪︎ आंतरपाटावरील स्वस्तिक , मांगल्याची खूण ,
आंतरपाटावरील स्वस्तिक , मांगल्याची खूण ,
…. पंतांचे आणि माझे जमले छत्तीस गुण
▪︎ उंन्हासंगे चाफा हसतो , थंडीसंगे गुलाब फुलतो ,
उंन्हासंगे चाफा हसतो , थंडीसंगे गुलाब फुलतो ,
.. सांगे सप्ततापदी चालतालना जीव माझा खुलतो
▪︎ राजबिंड्या डोलाने सप्ततापदी चालले ,
राजबिंड्या डोलाने सप्ततापदी चालले ,
…........…. पंतांशी पत्नीचे नाते जोडते
▪︎ शारदांचे चांदण्यात धरणी जाते नाहून ,
शारदांचे चांदण्यात धरणी जाते नाहून ,
….. पंतांचे नाव घेते सप्ततापदी म्हणून
▪︎ शुभ्र फुलांच्या मखमालीवर शुभमंगल झाले ,
शुभ्र फुलांच्या मखमालीवर शुभमंगल झाले ,
……..... पंतांची छाया होऊन सप्ततापदी चालले
▪︎ सायंकाळी देवघरात , निरंजन रोज लावते ,
सायंकाळी देवघरात , निरंजन रोज लावते ,
…….. पंतांच्या साथीने , सप्ततापदी चालते
▪︎ सात जन्मांचे रेशमी नाते , …. शी जोडले ,
भाव भरल्या भावनेने , सप्ततापदी मी चालले
भाव भरल्या भावनेने , सप्ततापदी मी चालले
▪︎चिमुकल्या ओढ्याची झाली विशाल नदी,
चिमुकल्या ओढ्याची झाली विशाल नदी,
............. पंतांच्या बरोबर केली सप्तपदी
▪︎ सप्तपदीची पावलं पडली अग्नीच्या साक्षीनं ,
सप्तपदीची पावलं पडली अग्नीच्या साक्षीनं ,
...... पंतांशी संसार करिन मोठ्यांच्या आशीर्वादानं
▪︎ जाईजुईचा वेल पसरला दाट ,
जाईजुईचा वेल पसरला दाट ,
.... पंतांबरोबर बांधेल जीवनाची गाठ
*वरमाला उखाणे :-*
▪︎ अत्तरदानी, गुलाबदानी , विडे ठेवले करून ,
अत्तरदानी, गुलाबदानी , विडे ठेवले करून ,
…...पंतांने मला घातली कुलस्वामिनीना स्मरून
▪︎ नाही नुसती फुले , नाही नुसता हार ,
नाही नुसती फुले , नाही नुसता हार ,
….. तर आहे माझा , … वरील प्रेमाचा आविष्कार
▪︎ नव्या कोऱ्या घागरीत , आंब्यांचे खार ,
नव्या कोऱ्या घागरीत , आंब्यांचे खार ,
…….. पंतांच्या गळ्यात घातली वरमाला हार
▪︎ वेलदोड्याच्या वेलावर हवा सुटली गार ,
वेलदोड्याच्या वेलावर हवा सुटली गार ,
…….. पंतांनि घातला मला वरमाला हार
▪︎ काचेच्या तांब्यात सरबत आहे गार ,
काचेच्या तांब्यात सरबत आहे गार ,
……... पंतांनि घातली मला वरमाला हार
▪︎ शब्दसुमने गुंफते तयार होते काव्यमला ,
शब्दसुमने गुंफते तयार होते काव्यमला ,
...…….. पंतांनि घातली मला वरमाला
▪︎ पर्जन्याचा वृष्ट्टीने सृष्ट्टी होते हिरवीगार ,
पर्जन्याचा वृष्ट्टीने सृष्ट्टी होते हिरवीगार ,
……… पंतांनि घातला मला वरमाला हार
*मंगळसूत्राची उखाणे :-*
▪︎ उखाणा म्हणजे शब्दांचा साज, परंपरा जपण्याचा रिवाज ,
उखाणा म्हणजे शब्दांचा साज, परंपरा जपण्याचा रिवाज ,
…......….......... पंतांचे नाव घेऊन मंगळसूत्र बांधते आज
▪︎ नारळाच्या झाडाला , अमृताचा झरा,
नारळाच्या झाडाला , अमृताचा झरा,
...... पंत माझ्या मंगळसुत्रातला हिरा
▪︎मंगळसूत्रा च्या वाट्यानी जोडले संसार माहेर ,
मंगळसूत्रा च्या वाट्यानी जोडले संसार माहेर ,
.......... पंतांनी दिला मला सौभाग्याचा आहेर
▪︎अलंकारात अलंकार मंगळसूत्र मूख्य,
अलंकारात अलंकार मंगळसूत्र मूख्य,
....... पंताचा आनंद हेच माझे सौख्य
▪︎ कृष्ण प्राप्तीसाठी , रुखमणीने लिहिले पत्र ,
कृष्ण प्राप्तीसाठी , रुखमणीने लिहिले पत्र ,
………....... पंतांची घातले मला मंगळसूत्र
▪︎ मंगळसुत्रचा असतात , पोवळ्याचे मणी ,
मंगळसुत्रचा असतात , पोवळ्याचे मणी ,
………….…....….. पंत माझे आहेत गुणी
▪︎ जिजाईचा मांडीवर शिवाजी सुपुत्र ,
जिजाईचा मांडीवर शिवाजी सुपुत्र ,
...............पंतांनी बांधले मंगळसूत्र
▪︎ मोहरली वधू भाव लाजरे डोळ्यात ,
मोहरली वधू भाव लाजरे डोळ्यात ,
.... पंतांनी मंगळसूत्र घातले गळ्यात
▪︎ अक्षता पडल्या सुखाने मन हिंदोळ्यावर झुलते ,
अक्षता पडल्या सुखाने मन हिंदोळ्यावर झुलते ,
…......... पंतांचे नाव घेऊन मी मंगळसूत्र घालते
▪︎ पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवीगार ,
पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवीगार ,
.... पंतांच्या जीवावर घालते मंगळसुत्रचा हार
▪︎शितल माझं नाव , सासवणे - अलिबाग माझं गाव ,
शितल माझं नाव , सासवणे - अलिबाग माझं गाव ,
.............. ह्यांचं नाव , ..... आता माझं आडनाव
*गठबंधं उखाणे :-*
▪︎ भरजरी शालूला आहे मयूरपंखी काठ ,
भरजरी शालूला आहे मयूरपंखी काठ ,
….. पंतांच नाव घेऊन बांधते दादा – वाहिनीचे
गाठ
▪︎ बकुळीच्या झाडाची छाया पडते दाट ,
बकुळीच्या झाडाची छाया पडते दाट ,
….. पंतांच नाव घेऊन सोडते दोघांची गाठ
▪︎ भावासंगे वाहिनीची पडली सुंदर गाठ ,
भावासंगे वाहिनीची पडली सुंदर गाठ ,
………. पंतांच नाव घेऊन सोडते गाठ
▪︎ चंदेरी साडीला नाजूकसा काठ ,
चंदेरी साडीला नाजूकसा काठ ,
……. पंतांच नाव घेऊन सोडते गाठ
▪︎कोंकणात जाताना लागतो वळण- वळणाचा घाट ,
कोंकणात जाताना लागतो वळण- वळणाचा घाट ,
.. पंतांचे नाव घेऊन सोडते भाऊ - भावजयची गाठ
▪︎सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न,
सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न,
............. पंतांन सोबत झाले माझे लग्न
▪︎ गुलाबी साडीला सोनेरी काठ ,
गुलाबी साडीला सोनेरी काठ ,
.... पंतानसोबत जोडलीय गाठ
*शालूंचे उखाणे :-*
▪︎शालूचा पदर आडकला तोड्यात,
शालूचा पदर आडकला तोड्यात,
.... प्ंताच नाव घेते या सोहळ्यात
▪︎ ओल्याचिंब केसांना , टॉवेल द्या पुसायला ,
ओल्याचिंब केसांना , टॉवेल द्या पुसायला ,
…...... पंतांचे नाव घेते शालू द्या नेसायला
▪︎ नऊवारी साडीवर शोभून दिसते ठुशी ,
नऊवारी साडीवर शोभून दिसते ठुशी ,
........ पंतांचे नाव घेते ....... दिवशी
▪︎ पैठणीवर शोभे , नाजूक मोरांची जोडी,
पैठणीवर शोभे , नाजूक मोरांची जोडी,
.. पंतांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी
▪︎ कुबेराच्या भांडारात हिरे – मणक्यांच्या राशी ,
कुबेराच्या भांडारात हिरे – मणक्यांच्या राशी ,
….….. पंतांनि आणला शालू लग्नाचा दिवशी
▪︎ ह्रिदवाराहून आला बाबा , त्याची दोन हात लांब दाढी ,
ह्रिदवाराहून आला बाबा , त्याची दोन हात लांब दाढी ,
…….. पंतांनि नेसायला आणायला मला भरगच्च साडी
▪︎ सर्वात छान आहेत इंदुरी सद्य ,
सर्वात छान आहेत इंदुरी सद्य ,
…पंतांच्या संसारात सुखाच्या पायघड्या
▪︎ कांजीवर साडी , बनारसी खण ,
कांजीवर साडी , बनारसी खण ,
…. पंतांचे नाव घेते आज आहे लग्न दिवस
▪︎ हिरव्या साडीला , पिवळा काठ जरतारी ,
हिरव्या साडीला , पिवळा काठ जरतारी ,
... पंतांचे नसावं घेते शालू नेसून भरजरी
*घास भरवणीचे उखाणे :-*
▪︎ मिठाने वाढते , स्वयंपाकाची लज्जत ,
मिठाने वाढते , स्वयंपाकाची लज्जत ,
…….. पंतांचे नाव घेते सुरु करा पंगत
▪︎ साजूक तुपात नाजूक चमचा ,
साजूक तुपात नाजूक चमचा ,
… पंतांचे नाव घेते आशीर्वाद हवा तुमचा
▪︎ संस्कृत मध्ये पाण्याला म्हणतात उदक,
संस्कृत मध्ये पाण्याला म्हणतात उदक,
.......... पंतना आवडतात खुप मोदक
▪︎ कैरी कोथींबीर, आल लसुन ,
कैरी कोथींबीर, आल लसुन ,
.... पंताचे नाव घेते सर्व ऐका बसुन
▪︎ हाताची घडी, तोंडावर बोट,
हाताची घडी, तोंडावर बोट,
.... पंत घ्या आमटीचा घोट
▪︎ दही , चक्का , आवडतो ह्यांना खूप ,
दही , चक्का , आवडतो ह्यांना खूप ,
…. पंतांचे नाव घेते मनापासून मी खूप
▪︎ खुप प्रसिद्ध आहेत कबीराचे दोहे
खुप प्रसिद्ध आहेत कबीराचे दोहे
........पंतना आवडतात कांदे पोहे
▪︎लग्नाच्या पंगतीत उखाणा घेते खास ,
लग्नाच्या पंगतीत उखाणा घेते खास ,
…….. पंतांचे नाव घेते तुमच्यासाठी खास.
▪︎ केसर दुधात घातलं काजू, बदाम , जायफळ ,
केसर दुधात घातलं काजू, बदाम , जायफळ ,
....... पंतांच नाव घेतो , वेळ न घालवता वायफळ
▪︎ नैवैद्याच्या वरण - भातावर तूप वाढले ताजे ,
नैवैद्याच्या वरण - भातावर तूप वाढले ताजे ,
…………..........…. च्यावर नाव कोरले माझे
▪︎मोदकाच्या प्रसादाला असते अवीट गोडी,
मोदकाच्या प्रसादाला असते अवीट गोडी,
.. पंतांचे नाव घेते बाप्पा सुखी ठेव आमची जोडी
▪︎ दवबिंदूत होतो , सप्ततारांगांचं भास ,
दवबिंदूत होतो , सप्ततारांगांचं भास ,
….…. ला नाव भरवतो ………. घास
▪︎स्वप्न सत्य झाले, नाही ठरला भास,
स्वप्न सत्य झाले, नाही ठरला भास,
... पंतांना भरवते गुलाबजांचा घास
▪︎ रुचकर भोजन झालं ,जमलाय मस्त पान ,
रुचकर भोजन झालं ,जमलाय मस्त पान ,
…... पंतांचे नाव घायला मला वाटत छान
▪︎मसाल्याची सुपारी चांदीच्या वाटीत ,
मसाल्याची सुपारी चांदीच्या वाटीत ,
......... पंताना ठेवीन माझ्या मुठीत
▪︎ शेंगदाण्याचा लाडवाला गूळ झाला जास्त ,
शेंगदाण्याचा लाडवाला गूळ झाला जास्त ,
………..….. सोबत संसार चालायला मस्त
▪︎ दुधाचा चहा , चहा मध्ये आले,
दुधाचा चहा , चहा मध्ये आले,
आज पासून मी , .... ची झाले
▪︎ गावठी गुलाबाला सुगंधी सुवास ,
गावठी गुलाबाला सुगंधी सुवास ,
...... पंतांना भरवते वरण भाताचा घास
▪︎पानात पान मसाल्याचे पान ,
पानात पान मसाल्याचे पान ,
..... पंतांचे नाव घेऊन राखते तुमचा मान
▪︎ साखर असते गोड । मिरची असते तिखट
साखर असते गोड । मिरची असते तिखट
…........ पंतांचे नाव घेते आडनावा सकट
▪︎ लोणावळा , खंडाळा , म्हणशील तिथे जाऊ ,
लोणावळा , खंडाळा , म्हणशील तिथे जाऊ ,
…....…... तुला भरवते , पण बोट नको चावू
▪︎ सुगरण – सुगरण करते संसार सुखाचा ,
सुगरण – सुगरण करते संसार सुखाचा ,
....... पंतांचे नाव घेऊन मान राखते सर्वांचा
▪︎लग्नाच्या पंगतीत केलीय फुलांची आरास,
लग्नाच्या पंगतीत केलीय फुलांची आरास,
.. पंतांचे नाव घ्यायला आजपासून करते सुरुवात
▪︎ चांदीच्या वाटीत ठेवला आमरस ,
चांदीच्या वाटीत ठेवला आमरस ,
…... पंतांच्या जीवनात होईन मी समरस
▪︎कृष्णच्या गायींना चरायला हिरवं-हिरवं कुरण ,
कृष्णच्या गायींना चरायला हिरवं-हिरवं कुरण ,
….पंतांचे नाव घायला जेवणाच्या पंगतीत कारण
▪︎ गूळ खोबर ,खमंग झालं ,करंजीचे सारण ,
गूळ खोबर ,खमंग झालं ,करंजीचे सारण ,
…. पंतांचे नाव घेते ,जेवणाचे पंगतीचे कारण
▪︎ वाड्यात वडा बटाटावडा ,
वाड्यात वडा बटाटावडा ,
…. मारला खडा म्हणून जमला आमचा जोड
▪︎सावित्रीबाईंनी फुलेंनी दिले , स्त्री शिक्षणाचे धडे ,
सावित्रीबाईंनी फुलेंनी दिले , स्त्री शिक्षणाचे धडे ,
….... ना आवडतात गरम – गरम साबुदाणा वडे
▪︎ रसदार केशरी आंब्याचा , केला गोड आमरस ,
रसदार केशरी आंब्याचा , केला गोड आमरस ,
……... पंतांच्या संसारात मनापासून झाले समरस
▪︎ आंबे , काजू ,फणस हा अलिबागचा मेवा ,
आंबे , काजू ,फणस हा अलिबागचा मेवा,
…. ना आणि मला सर्वानी आशीर्वाद द्यावा
▪︎ जाईजुच्या फुलांचा मधुर सुटतो सुवास ,
जाईजुच्या फुलांचा मधुर सुटतो सुवास ,
…….….…. पंतांचे नाव घेऊन देते घास
▪︎ पंचपक्वांनांचा जमलाय स्वादिष्ट मेळा ,
पंचपक्वांनांचा जमलाय स्वादिष्ट मेळा ,
…. पंतांचे नाव , घ्यायची हीच तर खरी वेळ
▪︎ चांदीच्या वाटीत साखरभाताची मूड ,
चांदीच्या वाटीत साखरभाताची मूड ,
….…....... पंत घ्या , देते केशरी दूध
▪︎ वरण – भातावर साजूक तुपाची धार ,
वरण – भातावर साजूक तुपाची धार ,
….…. पंतांचा नाव घेते , कळवळीने फार
▪︎ बटाट्याच्या / कोशिंबीर ( भाजीला ) खोबरे घालते किसून ,
बटाट्याच्या / कोशिंबीर ( भाजीला ) खोबरे घालते किसून ,
…. चा नाव घेते , जेवणाच्या पंगतीत बसून
▪︎ पांढऱ्या शुभ्र भातावर पिवळ धमक वरण ,
पांढऱ्या शुभ्र भातावर पिवळ धमक वरण ,
…..पंतांच्या नाव घेते जेवणाच्या पंगतीचा कारण
▪︎ .. (गावाचे नाव) ते .. ( गावाचे नाव ) १०० कि. मी. आहे अंतर,
.. (गावाचे नाव) ते .. ( गावाचे नाव ) १०० कि. मी. आहे अंतर,
..... पंतांचे नाव घेते घास भारावल्या नंतर
▪︎ तुरीच्या डाळीला , जिऱ्याची फोडणी ,
तुरीच्या डाळीला , जिऱ्याची फोडणी ,
....... पंत सोलत होते नारळाची सोडानी
▪︎ भरलेल्या पंगतीला सुंदर रांगोळीचा साज,
भरलेल्या पंगतीला सुंदर रांगोळीचा साज,
.......................... पंतांचे नाव घेते आज
▪︎ भरलेल्या पंगतीला रांगोळी काढली चित्रांची,
भरलेल्या पंगतीला रांगोळी काढली चित्रांची,
....... पंतांच्या साथीला बसली पंगत मित्रांची
*पाठवणीचे उखाणे :-*
▪︎सांजवात लावताना येते माहेरची आठवण,
सांजवात लावताना येते माहेरची आठवण,
........ पंतांनसाठी झाली सासरी पाठवणं
▪︎सप्त सुखाचें आशीर्वाद , वडिलधाऱयांच्ये दिले ,
सप्त सुखाचें आशीर्वाद , वडिलधाऱयांच्ये दिले ,
………..... पंतांच्या संसारात , मन माझे खुलले
▪︎ झगमगीत दिव्यांचे रोषणाईची सजली वरात ,
झगमगीत दिव्यांचे रोषणाईची सजली वरात ,
……....पंतांचे नाव घेते ……....….च्या दारात
▪︎ संध्येच्या पाळीला नागाची खून ,
संध्येच्या पाळीला नागाची खून ,
….. पंतांचे नाव घेते ....… ची सून
▪︎ जाईच्या मांडवावर रुमाल टाकला विणून ,
जाईच्या मांडवावर रुमाल टाकला विणून ,
…...... पंतांचे नाव घेते तुम्ही सांगितले म्हणून
▪︎ आईच्या मायेला मोल नसते कधी ,
आईच्या मायेला मोल नसते कधी ,
….. पंतांचे नाव घेते तुम्हा सर्वांच्या आधी
▪︎ कुंजवणात ऐकू येते श्रीकृष्णाची बासरी ,
कुंजवणात ऐकू येते श्रीकृष्णाची बासरी ,
…..….चया प्रेमासाठी चालले मी सासरी
▪︎ संसार रुपी जात्यावर विचारांचे काढले पीठ ,
संसार रुपी जात्यावर विचारांचे काढले पीठ ,
…….......... पंतांचे संसार नक्की होईल नीट
▪︎ सर्वत मंजुळ सारंगीचे सूर ,
सर्वत मंजुळ सारंगीचे सूर ,
…. पंतांसाठी माहेर केले दूर
▪︎ पानापानावर पडले नागाची खून ,
पानापानावर पडले नागाची खून ,
….. पंतांचे नाव घेते …. ची सून
▪︎ दही , चक्का , आवडतो मला खूप ,
दही , चक्का , आवडतो मला खूप ,
….. पंतांचे नाव घेते मनापासून मी खूप
▪︎ देवापुढे काढली रांगोळी मोराची ,
देवापुढे काढली रांगोळी मोराची ,
…... पंतांचा नाव घेते सून मी .…. ची
▪︎शब्दांनी शोभतो अर्थ , स्वरानीच सजतात सूर ,
शब्दांनी शोभतो अर्थ , स्वरानीच सजतात सूर ,
….... पंतांचे नाव घेऊन , माहेर पासून होते दूर
▪︎ वांगी बटाट्याची भाजीला खोबरे घालते किसून ,
वांगी बटाट्याची भाजीला खोबरे घालते किसून ,
............................. घेते पालखी मध्ये बसून
*गृहप्रवेश उखाणे :-*
▪︎ सायंकाळी गाई परततात त्या वेळेला म्हणतात गोधुळी ,
सायंकाळी गाई परततात त्या वेळेला म्हणतात गोधुळी ,
............. पंतांचे लग्न करून मी पडली चांगल्या कुळी
▪︎ चाली होती पायपीट , रणरणत्या ऊन्हात ,
चाली होती पायपीट , रणरणत्या ऊन्हात ,
.......... पंतांचे नाव घेते ....... च्या घरात
▪︎आम्रवृक्ष मोहरल्याने , लागते घ्रीश्माची चाहुल,
आम्रवृक्ष मोहरल्याने , लागते घ्रीश्माची चाहुल,
...........पंताच नाव घेउन टाकते पहील पाउल
▪︎इंद्रधनुष्य दिसतो जेव्हा असतं पावसात ऊन,
इंद्रधनुष्य दिसतो जेव्हा असतं पावसात ऊन,
......... पंताच नाव घेते ............. घरची सून
▪︎नवे नवे जोडपे , आशीर्वादासाठी वाकले,
नवे नवे जोडपे , आशीर्वादासाठी वाकले,
.... पंतांसोबत , मी घरी पहिले पाऊल टाकले
▪︎नव्या दिशा, नव्या आशा, नव्या घरी पदार्पण ,
नव्या दिशा, नव्या आशा, नव्या घरी पदार्पण ,
......... पंतांच्या जीवनात माझे सर्वस्व अर्पण
▪︎गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर,
गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर,
....... पंतांच्या हातात हात देऊन झाले मी निर्भर
▪︎ गानकोकिळा बालगंधर्व गाती सुरात ,
गानकोकिळा बालगंधर्व गाती सुरात ,
.....पंतांचे नाव घेते …...... च्या घरात
▪︎ उगवल्या भानूची कालिकांना लागली चाहूल ,
उगवल्या भानूची कालिकांना लागली चाहूल ,
….... पंतांचे संसारात टाकते मी पहिलं पाऊल
▪︎ श्रीकृष्णाच्या मस्तकावर सदैव असतो शेष ,
श्रीकृष्णाच्या मस्तकावर सदैव असतो शेष ,
………......पंतांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश
▪︎ कोवळ्या पालवीने लागते , वसंताची चाहूल ,
कोवळ्या पालवीने लागते , वसंताची चाहूल ,
… पंतांच्या संसारात टाकते मी पाहिलं पाऊल
▪︎ चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप ,
चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप ,
……….. पंतां समवेत ओलांडते माप
▪︎ दिल्याने ज्ञान वाढते , कमी होता नाही देऊन ,
दिल्याने ज्ञान वाढते , कमी होता नाही देऊन ,
… पंतांच्या घरात आज आले माप ओलांडून
▪︎ आकाशात उगवला चंद्र निषेला लागली चाहूल ,
आकाशात उगवला चंद्र निषेला लागली चाहूल ,
…....... पंतांच्या संसारात टाकते पहिले पाऊल
▪︎ माहेरचे मायापाश सोडून , आले आज सासरी ,
माहेरचे मायापाश सोडून , आले आज सासरी ,
माप ओलांडून प्रवेश करते …......पंतांच्या घरी
▪︎ करी बांधल्या कंकणासवें आले मी या घरी ,
करी बांधल्या कंकणासवें आले मी या घरी ,
…….. पंतांच्या संगतीत मी तृप्त सदा अंतरी
▪︎ सर्व देवांमद्दे श्रेष्ठ ब्रह्म , विष्णू , महेश ,
सर्व देवांमद्दे श्रेष्ठ ब्रह्म , विष्णू , महेश ,
..... पंतांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश
▪︎ दाराला तोरण मंगलकार्याची खून ,
दाराला तोरण मंगलकार्याची खून ,
..... पंतांचे नाव घेते ....... ची सून
▪︎ देवाचिया द्वारी उभा क्षणभरी ,
देवाचिया द्वारी उभा क्षणभरी ,
........ पंतांचे नाव घेते ..... च्या घरी
▪︎ श्रावण महिना म्हणजे कधी पाऊस - कधी ऊन ,
श्रावण महिना म्हणजे कधी पाऊस - कधी ऊन ,
.......... पंतशी लग्न करून झाली मी ...... सून
▪︎माहेरच्या ओढीने डोळे येतात भरून ,
माहेरच्या ओढीने डोळे येतात भरून ,
..... पंतांच्या संसारात मन गेले वळून
▪︎ समोरच्या फडताळात ठेवले होते फणसाचे गरे ,
समोरच्या फडताळात ठेवले होते फणसाचे गरे ,
..पंत वरतून दिसतात बरे नीट वागतील तेव्हा खरे
▪︎ आकाशाच्या प्रांगणात ब्रह्म, विष्णू,महेश,
आकाशाच्या प्रांगणात ब्रह्म, विष्णू,महेश,
......... पंतांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश
▪︎ बारिक मणी घरभर पसरले,
बारिक मणी घरभर पसरले,
.... पंतांसाठी माहेर विसरले
▪︎जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज ,
जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज ,
... पंतांच नाव घेऊन , करते गृहप्रवेश आज
▪︎ तिरंगी झेंड्यावर अशोकचक्राची खूण ,
तिरंगी झेंड्यावर अशोकचक्राची खूण ,
...... पंतांचे नाव घेते ........... ची सून
▪︎ लसणात लसूण गावरान लसूण ,
लसणात लसूण गावरान लसूण ,
....... पंतांच नाव घेते ...... सून
▪︎ पानापानावर पसरले , कोवळे कोवळे ऊन ,
पानापानावर पसरले , कोवळे कोवळे ऊन ,
.............. पंतांचे नाव ............... ची सून
*रंगपंचमीच्या / नागपंचमीच्या उखाणे :-*
▪︎ शंकराच्या पिंडीला नागदेवाचा वेढा ,
शंकराच्या पिंडीला नागदेवाचा वेढा ,
... पंतांचे नाव घेते , मला सासरचा ओढा
▪︎ नागपंचमीच्या पूजा करातात वंशवृद्धीसाठी ,
नागपंचमीच्या पूजा करातात वंशवृद्धीसाठी ,
………......... पंतांचे नाव घेते सौभाग्यासाठी
▪︎नागपंचमीला घरोघरी होते पुरणपोळी ,
नागपंचमीला घरोघरी होते पुरणपोळी ,
.. पंतांनी आणली मला कटकीची चोळी,
▪︎नागपंचमी दिवशी केला साखरभात,
नागपंचमी दिवशी केला साखरभात,
....... पंतांचे नाव घेते ....... ची नातं
▪︎ श्रावणात महादेवाला दुधाचा आभिषेक ,
श्रावणात महादेवाला दुधाचा आभिषेक ,
.... पंतचा नावाने बेला वाहिले एकशे एक
▪︎ सोन्याचे पंचपाल त्याला नागाचा वेढा ,
सोन्याचे पंचपाल त्याला नागाचा वेढा ,
….. पंतचा आणि माझा साथ जन्माचा जोड
▪︎ संध्येच्या पाळीला नागाची खून ,
संध्येच्या पाळीला नागाची खून ,
…... पंतांचे नाव घेते ..…… ची सून
▪︎ पंचमीचे सण माहेरची आठवण ,
पंचमीचे सण माहेरची आठवण ,
…… पंत करतात प्रेमाची साठवण
▪︎ शिमग्याची वेळी केली रंगाची बरसात ,
शिमग्याची वेळी केली रंगाची बरसात ,
…. पंतची आणि माझी जोडी राहो सुखात
*सत्यनारायचे उखाणे :-*
▪︎हंसराज पक्षी दिसतात होशी,
हंसराज पक्षी दिसतात होशी,
...... पंतांचे नाव घेते सत्यनारायण दिवशी
▪︎गणपतीच्या देवळात कीर्तन चालय मजेत,
गणपतीच्या देवळात कीर्तन चालय मजेत,
.. पंताचे नाव घेते सत्यनारायणाच्या पूजेत
▪︎ वसंतऋतूत कोकिळा , करते गुंजन ,
वसंतऋतूत कोकिळा , करते गुंजन ,
..पंतांच्या बरोबर करते लक्ष्मी पूजन
▪︎ अंगणात होती मेथी , पाणी घालू किती ,
अंगणात होती मेथी , पाणी घालू किती ,
…... पंतांच्या हातात सत्यनारायणाची पोथी
▪︎मांडवाच्या दारी केले , गणरायानाचे पूजन ,
मांडवाच्या दारी केले , गणरायानाचे पूजन ,
…. पंतांचे नाव घेते आज आहे लक्ष्मी पूजन
▪︎ …. ( गावाचे नाव ) टांगा त्याला आरबस्तानी घोडे ,
…. ( गावाचे नाव ) टांगा त्याला आरबस्तानी घोडे ,
………............... पंतांचे नाव घेते सत्यनारायणापुढे
▪︎ हातात घातल्या बांगडया, गळ्यात घातली ठुशी,
हातात घातल्या बांगडया, गळ्यात घातली ठुशी,
........ पंतांचे नाव घेते, सत्यनारायणाच्या दिवशी
▪︎वाल्मिकी ऋषींनी रचले रामायण ,
वाल्मिकी ऋषींनी रचले रामायण ,
.... पंतांना सोबत करते सत्यनारायण
▪︎ संगीताला वाद्यवृंद चढवतो साज,
संगीताला वाद्यवृंद चढवतो साज,
..... पंतांचे नाव घेते सत्यनारायण आहे आज
*चैत्रगौरीचे उखाणे :-*
▪︎ गौरीचे हळदीकुंकवाच्या राशी ,
गौरीचे हळदीकुंकवाच्या राशी ,
..... पंतांचे नाव घेते चैत्र माशी
▪︎ चैत्र , वैशाखात मोगरा फुलतो छान ,
चैत्र , वैशाखात मोगरा फुलतो छान ,
.... पंतांचे नाव घेऊन राखतो तुमचा मान
▪︎ गौरीपुढे लावली समयीची जोडी ,
गौरीपुढे लावली समयीची जोडी ,
…...... पंतांच्या नावाची आहे गोडी
▪︎ गौरीची आरास सर्वाना पसंत ,
गौरीची आरास सर्वाना पसंत ,
…. पंतांचे नाव घेते ऋतू आहे वसंत
▪︎ गौरीचे पुढे केशर - अत्तराचे सडे ,
गौरीचे पुढे केशर - अत्तराचे सडे ,
…. पंतांचे नाव घायाळ मी सर्वाना पुढे ,
▪︎ गौरीला लावते वाळ्याचे अत्तर ,
गौरीला लावते वाळ्याचे अत्तर ,
….. पंतांचे नाव घायला मी सदैव तत्पर
▪︎ आंगठीतल्या हिऱ्याला सोन्याचे कोंदण ,
आंगठीतल्या हिऱ्याला सोन्याचे कोंदण ,
.... पंतांचे नाव घेऊन गौरीला करते वंदन
▪︎ घाटातला धान्य भरभरून वाढलं ,
घाटातला धान्य भरभरून वाढलं ,
….. पंतांसंगे मी संसारसुख मंडळ
▪︎वसंतातील डाळ पन्ह , देती थंडावा ,
वसंतातील डाळ पन्ह , देती थंडावा ,
.... पंतांच नाव घेते आशीर्वाद सर्वांचा असावा
*वटसावित्रीचे उखाणे :-*
▪︎ नाजूक अनारसे साजूक तुपात टाळावे ,
नाजूक अनारसे साजूक तुपात टाळावे ,
…. पंतां सारखे पती जन्मोजन्मी मिळावे
▪︎ जीवनरूपी काव्य दोघांनी वाचावी ,
जीवनरूपी काव्य दोघांनी वाचावी ,
…. पंतांची साथ जन्मोजन्मी असावी
▪︎ रुपयाच्या झारीला सोन्याचा गिलावा ,
रुपयाच्या झारीला सोन्याचा गिलावा ,
….. पंत हाच पती मला जामोजन्मी मिळावा
▪︎ कस्तुरीचा जन्म सुगंधाकरिता ,
कस्तुरीचा जन्म सुगंधाकरिता ,
माझे सारे जीवन …... पंताकरिता
▪︎ सत्यवानाच्या सेवेत सावित्री माझी मग्न ,
सत्यवानाच्या सेवेत सावित्री माझी मग्न ,
…………….पंत लाभो मला साथ जन्म
▪︎ देवीचा भरलं बोडण , वाचला देवीचा पाठ ,
देवीचा भरलं बोडण , वाचला देवीचा पाठ ,
….. पंतांच्या बरोबर बांधली , जन्मोजन्मी गाठ
▪︎ पैंजणाचा आवाज रुणझुण पडतो कानी ,
पैंजणाचा आवाज रुणझुण पडतो कानी ,
…. पंत उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना करते मनोमनी
*मंगळागौरीचे उखाणे :-*
▪︎ महाराष्ट्राची परंपरा , मंगळागौरीचे खेळ ,
महाराष्ट्राची परंपरा , मंगळागौरीचे खेळ ,
.. पंतांचे नाव घेते , झाली पहाटेची वेळ
▪︎सुर्यबिंबाचा कुमकुमतिलक , पृथ्वीच्या भाळी,
सुर्यबिंबाचा कुमकुमतिलक , पृथ्वीच्या भाळी,
......... पंताचे नाव घेते , मंगळागौरीच्या वेळी
▪︎ विवेकानंदाचे स्मारक , कान्यकुमारिकेच्या सीमेवर ,
विवेकानंदाचे स्मारक , कान्यकुमारिकेच्या सीमेवर ,
……............ पंतांचे नाव घेते , मंगळागौरीचे वेळेवर
▪︎गौरीच्या पुढं मांडलं फराळाचं ताटं ,
गौरीच्या पुढं मांडलं फराळाचं ताटं ,
.......... पंतांचे माझी बघतात वाट!
▪︎ स्वर्गीच्या नंदवनात सुवर्णाच्या केली ,
स्वर्गीच्या नंदवनात सुवर्णाच्या केली ,
…..... पंतांचे नाव घेते मंगळागौरीचे वेळी
▪︎ यमुनेच्या काठी राधाकृष्नच खेळ ,
यमुनेच्या काठी राधाकृष्नच खेळ ,
….. पंतांचे नाव घेते मंगळागौरीचे वेळ
▪︎ प्रभात समय सुखावतो गाता भूपाळी ,
प्रभात समय सुखावतो गाता भूपाळी ,
…. पंतांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी
▪︎ दंडात घालते वाकी , हातात घालते तोडी ,
दंडात घालते वाकी , हातात घालते तोडी ,
…....... पंतांचे नाव घेते मंगलागूआरीचे पुढती
▪︎ आंब्याच्या वनात कोकिळेचे गुंजन ,
आंब्याच्या वनात कोकिळेचे गुंजन ,
…. पंतांचे नाव घेऊन करते मी मंगळागौरीचे पूजन
▪︎ जडावाचे मंगळसूत्र कोल्हापुरी साज ,
जडावाचे मंगळसूत्र कोल्हापुरी साज ,
... पंतांचे नाव घेते मंगळागौरी आहे आज
▪︎ मांडवाचये दारी केळीच्या तोरण ,
मांडवाचये दारी केळीच्या तोरण ,
…. पंतांचे नाव घेते मंगळागौरीचे कारण
▪︎ दारावर लावले लोकरीचे तोरण ,
दारावर लावले लोकरीचे तोरण ,
….. पंतांचे नाव मंगळागौरीचे कारण
▪︎ परसदाराच्या बागेत नाना तह्रेचे पक्षी ,
परसदाराच्या बागेत नाना तह्रेचे पक्षी ,
…... पंतांचे नाव घेते मंगळागौर साक्षी
▪︎ रातराणीच्या सदा पडला माझ्या दारी ,
रातराणीच्या सदा पडला माझ्या दारी ,
…. पंतांचे नाव घेते मंगळागौर आहे दारी
▪︎ कुबेराच्या घरी सोन्या चांदीच्या राशी ,
कुबेराच्या घरी सोन्या चांदीच्या राशी ,
.. पंतांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी
▪︎ हिरव्यागार दुर्वा रानोमाळी उगवल्या ,
हिरव्यागार दुर्वा रानोमाळी उगवल्या ,
……. पंतांच्यासाठी मंगळागौर जागवल्या
▪︎ पूजेच्या साठी जमविल्या नानाविधी पत्री ,
पूजेच्या साठी जमविल्या नानाविधी पत्री ,
.....…. पंतांचे नाव घेते मंगळागौरीचे रात्री
▪︎ पावसाच्या आगमनाने प्रसन्न झाली धरती ,
पावसाच्या आगमनाने प्रसन्न झाली धरती ,
………….....पंतांचे नाव मंगळागौरीचे रात्री
▪︎ सौभाग्याची जीवन ज्योत प्रीत - तेलाने तेवते ,
सौभाग्याची जीवन ज्योत प्रीत - तेलाने तेवते ,
......... पंतांना दीर्घायुषी मंगळागौरीस मागते
▪︎ मंगळागौरीच्या पूजेला वाहते मी साळी - डाळी ,
मंगळागौरीच्या पूजेला वाहते मी साळी - डाळी ,
….. पंतांच्या संसारात लिहिते भाग्याचा ओळी
▪︎ भिल्लीणीचा रूपात शंकरापुढे आली गिरीजा ,
भिल्लीणीचा रूपात शंकरापुढे आली गिरीजा ,
….. पंतांच्या सौभाग्यासाठी केली मंगळागौरीची पूजा
▪︎ घरात भरल्या आठरा धान्यांच्या राशी ,
घरात भरल्या आठरा धान्यांच्या राशी ,
…. पंतांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी
▪︎ हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी ,
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी ,
…. पंतांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी
▪︎ आत्तरदानी , गुलाबदानी , पान ठेवते करून ,
आत्तरदानी , गुलाबदानी , पान ठेवते करून ,
........... पंतांचे नाव घेते मंगळागौरीला स्मरून
▪︎ वीज पुरवठासाठी कोयनेच्या काठी बांधले धरण ,
वीज पुरवठासाठी कोयनेच्या काठी बांधले धरण ,
............... पंतांचे नाव घेते मंगळागौरीचे कारण
▪︎ चांदीच्या वाटीत ठेवते पेढे ,
चांदीच्या वाटीत ठेवते पेढे ,
…. पंतांचे नाव घेते मंगळागौरी पुढे
*हरतालिका उखाणे :-*
▪︎ घरात भरल्या आठरा धान्यांच्या राशी ,
घरात भरल्या आठरा धान्यांच्या राशी ,
….... पंतांचे नाव घेते हरतालिकेच्या दिवशी
▪︎ उत्तररात्री शिव – पार्वती , कैलासाला निघतील ,
उत्तररात्री शिव – पार्वती , कैलासाला निघतील ,
….............. पंतांच्या सौख्याचे , वरदान मला देतील
*दिवाळीचे उखाणे :-*
▪︎ आंबाबाईच्या देवळात बिलावर आरास ,
आंबाबाईच्या देवळात बिलावर आरास ,
………..…. पंत ला घास घालते अनारसा
▪︎ देवीला शिवली जरीकाठीची चोळी ,
देवीला शिवली जरीकाठीची चोळी ,
…. पंतांच्या घरी रोज असते सुखाची दिवाळी
▪︎ पैठणची पैठणी, कोल्हापूरचा साज ,
पैठणची पैठणी, कोल्हापूरचा साज ,
….. पंतांचे नाव घेते दिवाळी आहे आज
▪︎ कांजीवरम साडी , बनारसी खण ,
कांजीवरम साडी , बनारसी खण ,
…. पंतांचे नाव घेते , आज आहे दिवाळी सण
▪︎ अन्यन भावनेने देवाला जावे शरण ,
अन्यन भावनेने देवाला जावे शरण ,
…. पंतांचे नाव घायला दिवाळीच्या आहे कारण
▪︎ गूळ खोबर ,खमंग झालं ,करंजीचे सारण ,
गूळ खोबर ,खमंग झालं ,करंजीचे सारण ,
….... पंतांचे नाव घेते , दिवाळी सणाचे कारण
*लग्नाचा वाढदिवस उखाणे :-*
▪︎ .....पंतांच्या संसारात नाही , भासले काही उणे ,
.....पंतांच्या संसारात नाही , भासले काही उणे ,
सूर जुळले दोघांचे , जीवन झाले सुरेल गाणे
▪︎ रुसवे – फुगवे , अबोल – दुरावे , कधी कधी होतात ,
रुसवे – फुगवे , अबोल – दुरावे , कधी कधी होतात ,
समजूत काढायला नेहमी , ……........... पुढे असतात
▪︎ माणसाकडे असावी माणुसकी , नसावा अहंकार ,
माणसाकडे असावी माणुसकी , नसावा अहंकार ,
...................... पंत मिळाले हाच खरा अलंकार
*पतीच्या वाढदिवस उखाणे :-*
▪︎ चांदीच्या तबकात , सोन्याची निरंजन तेवते ,
चांदीच्या तबकात , सोन्याची निरंजन तेवते ,
………. पंतांसाठी दीर्घारोग्य , देवाकडे मागते
▪︎ ओक्षण करते वाढदिवसाला , सोनियाच्या ज्योती ,
ओक्षण करते वाढदिवसाला , सोनियाच्या ज्योती ,
........... पंतांची उत्तोरोत्तर वाढो , जगामध्ये किर्ती
▪︎वाढदिवशी चरणी तुझिया हेच मागणे प्रभो ,
वाढदिवशी चरणी तुझिया हेच मागणे प्रभो ,
…..... पंतांच्या कर्तृत्त्वाला , क्षितिजे नवी लाभो
*डोहाळ जेवणाचे उखाणे :-*
▪︎मखमली हिरवळीवर पाखरांचा थवा ,
मखमली हिरवळीवर पाखरांचा थवा ,
... पंतांच्या वंशाला लावीन दीप नवा
▪︎नयनाच्या आकाशात उमलते शुक्राची चांदणी ,
नयनाच्या आकाशात उमलते शुक्राची चांदणी ,
सर्वांच्या आशीर्वादाने बाग फुलवते ... पंतांच्या अंगणी
▪︎उखाणा घेउन, सुप्तगुणांना मिळतो वाव,
उखाणा घेउन, सुप्तगुणांना मिळतो वाव,
डोहाळ जेवणाच्या दीवशी , घेते ..... पंताच नाव
▪︎माझ्या सासर - माहेर , लोक सारी हौशी ,
माझ्या सासर - माहेर , लोक सारी हौशी ,
...... पंतांचे नाव घेते डोहाळाच्या दिवशी
▪︎बाळाच्या नाजूक गालावर पडते इवलीशी कळी ,
बाळाच्या नाजूक गालावर पडते इवलीशी कळी ,
…..... पंतांच्या संसारवेलीवर उमलेल नाजूक कळी
▪︎मोहरसली माझी माया, लागता नवी चाहूल ,
मोहरसली माझी माया, लागता नवी चाहूल ,
......... पंतांच घेते आता जाड झाले पाऊल
▪︎ मावळला सूर्य उगवला शशी ,
मावळला सूर्य उगवला शशी ,
…. पंतांचे नाव डोहाळ जेवणाच्या दिवशी
▪︎ पहाटे वेलीवर फुलतात फुले गोमटी ,
पहाटे वेलीवर फुलतात फुले गोमटी ,
…… पंतांचे नाव भरली माझी ओटी
▪︎ आनंदाचे कारंजे , मनी उडते थुई – थुई ,
आनंदाचे कारंजे , मनी उडते थुई – थुई ,
……….... पंतांच्या बाळाची , आता होणार मी आई
▪︎डोहाळे जेवणाला सजवली पानं फुलांची नौका ,
डोहाळे जेवणाला सजवली पानं फुलांची नौका ,
.................. पंतांचा नाव घेते,लक्ष देऊन ऐका
▪︎ सरस्वतीच्या मंदिरात , साहित्याच्या राशी ,
सरस्वतीच्या मंदिरात , साहित्याच्या राशी ,
…..... पंतांचे नाव घेते डोहाळजेवण दिवशी
▪︎ देवार्यात देवापाशी मंद ज्योत तेवते ,
देवार्यात देवापाशी मंद ज्योत तेवते ,
…. पंतांचे नाव डोहाळजेवण दिवशी घेते
▪︎गोप – गोपिकांना करते धुंद , कृष्णची बासरी ,
गोप – गोपिकांना करते धुंद , कृष्णची बासरी ,
….. पंतांची नाव घेते डोहाळजेवण आहे सासरी
▪︎ पौर्णिमेचा चांदणं हसतेय माझ्या गाली ,
पौर्णिमेचा चांदणं हसतेय माझ्या गाली ,
……. पंतांच्या वासराची चाहूल मला लागली
▪︎सासूबाई आहेत प्रेमळ , वनसाबाई आहेत होशी ,
सासूबाई आहेत प्रेमळ , वनसाबाई आहेत होशी ,
….......... पंतांचे नाव घेते , डोहाळजेवणाच्या दिवशी
▪︎ सकाळ होताच पूर्वेला , सूर्यनारायण उगवेल ,
सकाळ होताच पूर्वेला , सूर्यनारायण उगवेल ,
..……. पंतांच्या संसारात , नवीन कळी उमलेल
▪︎मखमली हिरवळीवर पाखरांचा थवा ,
मखमली हिरवळीवर पाखरांचा थवा ,
... पंतांच्या संसारात लावीन दीप नवा
▪︎ बाळाच्या हसऱ्या प्रवेशाने भरले घर ,
बाळाच्या हसऱ्या प्रवेशाने भरले घर ,
.. पंतांच्या संसारात पडली नवी भर
*बारस्याचे उखाणे :-*
▪︎बेलबाळ्या , घोसबाळ्या , लावले माझे कान ,
बेलबाळ्या , घोसबाळ्या , लावले माझे कान ,
......... पंतांचे बाळाचे नाव ठेवले किती छान
▪︎फुलांच्या सोडल्या माळ , जागोजागी लावले आरसे ,
फुलांच्या सोडल्या माळ , जागोजागी लावले आरसे ,
.................... पंतांच्या बाळाचे आज आहे बारसे,
▪︎ हिरव्या - हिरव्या शेतात पिकली मोत्याची कणसं ,
हिरव्या - हिरव्या शेतात पिकली मोत्याची कणसं ,
......….....…… पंतांचे नाव घेते आज आहे बारस
▪︎ हिरवं - हिरवं लिंबू गारस ,
हिरवं - हिरवं लिंबू गारस ,
….... पंतांच्या बाळाचा बारस
▪︎ आईपणाची भाग्य आलं माझ्या पदरी ,
आईपणाची भाग्य आलं माझ्या पदरी ,
…........ पंतांचा नाव घेते बारस आहे घरी
▪︎ बगळ्याची मान उंच , विहारात आकाशी ,
बगळ्याची मान उंच , विहारात आकाशी ,
…..... पंतांचे नाव घेते …....... या दिवशी
▪︎ सौभाग्याचा लेणं मणी मंगळसूत्र ,
सौभाग्याचा लेणं मणी मंगळसूत्र ,
…......... पती माझे .…..... चे पुत्र
▪︎ शिसवी पाळण्याला केला मोत्याचा साज ,
शिसवी पाळण्याला केला मोत्याचा साज ,
…...... पंतांचे नाव घेते ...... चे बारस आज
▪︎नातवाचा तोंड पाहून सुखावल्या दोंन्ही आज्या ,
नातवाचा तोंड पाहून सुखावल्या दोंन्ही आज्या ,
.......... पंतांचा नाव घेते जमल्या मैत्रिणी माझ्या
▪︎ नीलवर्णी आकाशात चमकतो शशी ,
नीलवर्णी आकाशात चमकतो शशी ,
……... पंतांचे घेते बारश्याच्या दिवशी
▪︎ दशरथ राजाने , पुत्रासाठी केला नवस ,
दशरथ राजाने , पुत्रासाठी केला नवस ,
………... पंतांच्या मुलाचा बारशाचा दिवस
▪︎सूर्यबिंबाचा कुंकुम तिलक , पृथ्वीच्या भाळी ,
सूर्यबिंबाचा कुंकुम तिलक , पृथ्वीच्या भाळी ,
............. पंतांचे नाव घेते , बारशाच्या वेळी
▪︎ गुलाबांचा ताटवा, लतांचा कुंज
गुलाबांचा ताटवा, लतांचा कुंज
... पंतांच्या बाळाची आज आहे मुंज
▪︎गोकुळात आला कृष्ण , सर्वाना झाला हर्ष,
गोकुळात आला कृष्ण , सर्वाना झाला हर्ष,
........ पंतांच्या बाळाला लागले पहिले वर्ष
*संक्रांतीचे उखाणे :-*
▪︎निसर्ग निर्मितीच्या वेळी, सूर्यनारायणा झाले माळी,
निसर्ग निर्मितीच्या वेळी, सूर्यनारायणा झाले माळी,
.................... पंताचे नाव घेते , संक्रांतीच्या वेळी
▪︎काकवी पासुन, बनवतात गुळ ,
काकवी पासुन, बनवतात गुळ ,
... चे नाव घेऊन वाटते तिळगुळ
▪︎उन्हाळाच्या वेळेला पाणी टाकते केळीला,
उन्हाळाच्या वेळेला पाणी टाकते केळीला,
........ पंताचे नाव घेते संक्रातीच्या वेळेला
▪︎तिळगुळाचा संक्रांतीला जमतो स्वादिष्ट मेळ ,
तिळगुळाचा संक्रांतीला जमतो स्वादिष्ट मेळ ,
…...... पंतांचे नाव घ्यायची , हीच तर खरी वेळ
▪︎ सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ ,
सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ ,
…. पंतांचे नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगुळ
▪︎ गोकुळ सारखं सासर ,सारे कसे होशी ,
गोकुळ सारखं सासर ,सारे कसे होशी ,
…. पंतांचे नाव घेते , तीळ – संक्रांतीच्या दिवशी
▪︎तिळगुळाच्या देवघेवीं दृढ प्रेमाचा जुळत नातं ,
तिळगुळाच्या देवघेवीं दृढ प्रेमाचा जुळत नातं ,
………. पंतांचा नाव आज आहे मकर संक्रांत
▪︎ जास्वंदीच्या फुलांचा हार , शोभतो गणरायांच्या गळ्यात ,
जास्वंदीच्या फुलांचा हार , शोभतो गणरायांच्या गळ्यात ,
..................... पंताचेनाव घेते , सुवासिनिच्या मेळ्यात
*मुलांनी घेणे उखाणे :-*
▪︎ लग्नात लागतात हार आणि तुरे,
लग्नात लागतात हार आणि तुरे,
..... च नाव घेतो आग्रह आता पुरे
▪︎ पाण्यात कळशी बुडावाल्यावर पाण्याचा
आवाज येतो बुडबुड,
पाण्यात कळशी बुडावाल्यावर पाण्याचा
आवाज येतो बुडबुड,
..... च नांव घेतो करू नका आता लुडबुड
▪︎ कोकणात जाताना लागतात , अळन- वळन ,
कोकणात जाताना लागतात , अळन -वळन ,
माझा छंद आहे ........................... छळन ,
▪︎ गर गर गोल , फिरतो भवरा ,
गर गर गोल , फिरतो भवरा ,
.... च नाव घेतो मी तिचा नवरा
▪︎ मसाल्याची सुपारी चांदीच्या वाटीत ,
मसाल्याची सुपारी चांदीच्या वाटीत ,
.............. ला ठेवीन माझ्या मुठीत
▪︎ भल्या मोठ्या समुद्रात, छोटीशी होडी,
भल्या मोठ्या समुद्रात, छोटीशी होडी,
.......... ची आणी माझी शोभते जोडी
▪︎शेल्याशेल्याची बांधली गाठ,
शेल्याशेल्याची बांधली गाठ,
...... च नाव झाल मला पाठ
▪︎रोज दिवस नवा व अनुभवही नवा,
रोज दिवस नवा व अनुभवही नवा,
.... च नाव घेतो आशीर्वाद तुमचा हवा
▪︎उखाणा आठवत नाही, आता काय करू,
उखाणा आठवत नाही, आता काय करू,
................. च नाव घेतो नका घाई करू
▪︎ अलिबागचे कलिंगड,अलिबागचे नारळ ,
अलिबागचे कलिंगड, अलिबागचे नारळ ,
............ चे नाव घेतो साधे आणि सरळ
▪︎ मंगल झाली प्रभात , विहंग उडाले गात ,
मंगल झाली प्रभात , विहंग उडाले गात ,
..................….. च्या हाती दिला हात
▪︎ प्रभात समय , सुखावतो गाता भूपाळी ,
प्रभात समय , सुखावतो गाता भूपाळी ,
……...… चे नाव घेतो मेहंळदीच्या वेळी
▪︎ मेघवर्णी आकाशात , लकाकते चपला ,
मेघवर्णी आकाशात , लकाकते चपला ,
…..… ला ……. आशीर्वाद द्या आपला
▪︎ दासांचा दासबोध अनुभवाचा साठा
दासांचा दासबोध अनुभवाचा साठा
.... चे नाव घेतो तुमचा मान मोठा !
▪︎शंकराला वाहील बेल आणि पान ,
शंकराला वाहील बेल आणि पान ,
... चा नाव घेतो, ऐका देऊन कान
▪︎मंदिरात वाहतो फुल आणि पान ,
मंदिरात वाहतो फुल आणि पान ,
.... च नाव घेतो , ठेऊन सर्वांचं मान
▪︎ आशीवार्दाची फुले वेचतो वाकून
आशीवार्दाची फुले वेचतो वाकून
... च नाव घेतो तुमचा मान राखून
▪︎सर्वांच्या आशीर्वादाची शाल घेतो पांघरून ,
सर्वांच्या आशीर्वादाची शाल घेतो पांघरून ,
................. च्या बरोबर मन गेलं गांगरून
▪︎ द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
.... च नाव घेतो राखते तुमचा मान
▪︎ फुटता तांबडं पूर्वेला , कानी येते भूपाळी ,
फुटता तांबडं पूर्वेला , कानी येते भूपाळी ,
……...…... चे नाव घेतो हळदीच्या वेळी
▪︎ मांडवाचये दारी केळीच्या तोरण ,
मांडवाचये दारी केळीच्या तोरण ,
…. चे नाव घेतो हळदीच्या कारण
▪︎पिवळं सोन , पांढरी शुभ्र चांदी,
पिवळं सोन , पांढरी शुभ्र चांदी,
....... ने काढली , माझ्या नावाची मेहंदी
▪︎ साजूक तुपात नाजूक चमचा ,
साजूक तुपात नाजूक चमचा ,
… चे नाव घेतो आशीर्वाद हवा तुमचा
▪︎ मिठाने वाढते , स्वयंपाकाची लज्जत ,
मिठाने वाढते , स्वयंपाकाची लज्जत ,
……...... चे नाव घेतो सुरु करा पंगत
▪︎स्वप्न सत्य झाले, नाही ठरला भास,
स्वप्न सत्य झाले, नाही ठरला भास,
.......ला भरवतो गुलाबजांचा घास
▪︎काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत ,
काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत ,
........ शिवाय मला नाही करमत
▪︎ दही , चक्का , आवडतो मला खूप ,
दही , चक्का , आवडतो मला खूप ,
….... चे नाव घेतो मनापासून मी खूप
▪︎ गूळ खोबर ,खमंग झालं ,करंजीचे सारण ,
गूळ खोबर ,खमंग झालं ,करंजीचे सारण ,
..... चे नाव घेतो , दिवाळी सणाचे कारण
▪︎लग्नाच्या पंगतीत उखाणा घेतो खास ,
लग्नाच्या पंगतीत उखाणा घेतो खास ,
….…. चे नाव घेतो तुमच्यासाठी खास.
▪︎ एक होती चिऊ ,एक होती काऊ ,
एक होती चिऊ ,एक होती काऊ ,
...... नाव घेतो आता काय काय खाऊ
▪︎ केसर दुधात घातलं काजू, बदाम , जायफळ ,
केसर दुधात घातलं काजू, बदाम , जायफळ ,
....... चा नाव घेतो , वेळ न घालवता वायफळ
▪︎मोदकाच्या प्रसादाला असते अवीट गोडी,
मोदकाच्या प्रसादाला असते अवीट गोडी,
.. च नाव घेते बाप्पा सुखी ठेव आमची जोडी
▪︎पानात पान मसाल्याचे पान ,
पानात पान मसाल्याचे पान ,
....... च नाव घेऊन राखतो तुमचा मान
▪︎वसंतातील डाळ पन्ह , देती थंडावा ,
वसंतातील डाळ पन्ह , देती थंडावा ,
.... च नाव घेतो आशीर्वाद सर्वांचा असावा
▪︎डाळिंबाचे झाड , पानोपानी दाटले ,
डाळिंबाचे झाड , पानोपानी दाटले ,
..... चा नाव घेताना , आनंदी मला वाटले
▪︎ चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप ,
चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप ,
……….……... समवेत ओलांडते माप
▪︎नवे नवे जोडपे , आशीर्वादासाठी वाकले,
नवे नवे जोडपे , आशीर्वादासाठी वाकले,
.... सोबत , मी घरी पहिले पाऊल टाकले
▪︎वळिवाच्या पावसाने , गंधित होते माती ,
वळिवाच्या पावसाने , गंधित होते माती ,
....... च नाव घेऊन नवीन जोडली नाती
▪︎वाऱ्यावरती हलके हलके काली उमलली मस्त,
वाऱ्यावरती हलके हलके काली उमलली मस्त,
............. च नाव घ्यायला कारण लाभलं मस्त
▪︎ सागराच्या लाटांत डुलते नौका ,
सागराच्या लाटांत डुलते नौका ,
..... चे नाव घेतो सर्वानी ऐका
▪︎ आंब्यात आंबा हापुस आंबा,
आंब्यात आंबा हापुस आंबा,
.... चे नाव घेतो , तुम्ही थोड थांबा
▪︎ मातीच्या चुली घालतात घरोघर ,
मातीच्या चुली घालतात घरोघर ,
.. झालीस माझी आता चल बरोबर
▪︎ अलिबागचे कलिंगड ,गोव्याचे काजू ,
अलिबागचे कलिंगड , गोव्याचे काजू ,
.... चे नाव घ्यायला मी कशाला लाजू
▪︎ आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कुंजन ,
आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कुंजन ,
................. सोबत करतो मी लक्ष्मीपूजन
▪︎ अलिबागच्या समुद्रावर मऊ मऊ वाळू ,
अलिबागच्या समुद्रावर मऊ मऊ वाळू ,
............. ना घेतो चल सारिपाठ खेळू
▪︎ लग्नाचा वाढदिवस करू साजरा ,
लग्नाचा वाढदिवस करू साजरा ,
..... तुला आणला मोगार्याचा गजरा
No comments:
Post a Comment